निरंतर...
जग तुला साच्यात बांधू पाहील
तु ते तोडत रहा निरंतर...
जग तुला रूळलेल्या वाटेवर ओढील
तु ते झुगारत रहा निरंतर..
जग तुला व्यवहारीक करीत राहील
तु ते नाकारत रहा निरंतर..
जग तुला हिशोब करायला लावत राहील
तु हातचा विसरत रहा निरंतर..
जग भाग द्यायला शिकवत राहील
तु बाकी शुन्य ठेवत जा निरंंतर..
जग तुला थांबवत राहील
तु चालत रहा निरंतर..
जग तुझी व्याख्या करू पाहील
तु अपवाद बनत रहा निरंतर..
जग तुला सोनं देऊ पाहील
तु परीसाचा हट्ट ठेव निरंतर..
जग जगासारखं वागत राहील
तु 'तुझ्या'सारखं जग निरंतर...।।
©निरंजन🌱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा