मोजणी




दोस्ता, तो नोटांची बंडलं मोजतो आणि तु चांगुलपणा
दोघांचंही सारखंच आहे बघ..
जिथे मोजणी सुरू झाली तिथच चांगुलपणा संपला रे
अरे नेकी कर और कुवे मे डाल ‌ऐकलं नाही का तू कधी
आणि बघ तुला मोजायचंच असेल ना तर तु मोज ना
जे शब्दांत मांडताही येणार नाही ना ते सुख मोज
प्राजक्ताचा सडा पाहून थबकलेली पावलं मोज
बकुळ फुलांच्या सुगंधाने मोहरून गेलेलं आसमंत मोज
नदीकाठी एकांतात बसुन घालवलेले क्षण मोज
तळ्याकाठी बसून पाहिलेले सुर्यास्त मोज
पाखरांचा किलबिलाट अन् पाण्याचा खळखळाट मोज
ती जत्रेतली जिलबी अन् तो टपरीवरचा चहा मोज
आई-वडिलांच्या डोळ्यातलं समाधान मोज
आजी-आजोबांनी केलेले लाड मोज
अरे वेड्या मोजायचंच असेल तुला तर जगणं मोज ना!

© निरंजन 🌱

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नकळत...

निरंतर...

नियती